चिपळूणमध्ये एका रिक्षाची आणि दुचाकीची जबर धडक होते. या अपघातात दुचाकी बाजुला जाऊन पडते तर रिक्षा जागेवरच गोल फिरत राहते. या अपघाताचा व्हिडीओही समोर आलाय जो सध्या व्हायरल होतोय.
चिपळूण मधील चिंच नाका परिसरात रिक्षा आणि दुचाकीची जोरदार टक्कर झाली. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांसह रिक्षाचालक जखमी झाला आहे. भरधाव जाणाऱ्या दुचाकीवर रिक्षा धडकल्यानंतर रिक्षाचालक बाहेर फेकला गेला. काही काळ रिक्षा जागेवरच गोल फिरत होती, मात्र आजूबाजूच्या सतर्क नागरिकांनी धावत मदत केली
advertisement
अपघातामुळे फिरत असलेल्या रिक्षाला नागरिकांनी वेळीच पकडल्यामुळे रिक्षातील प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. चिपळूण मधील चिंच नाका परिसरात बेशिस्तपणे होणारी वाहतूक हा चिंतेचा विषय बनलाय.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 27, 2024 4:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ड्रायव्हर बाजूला पडला अन् रिक्षा जागेवरच फिरत राहिली, चिपळूणमधील अपघाताचा LIVE VIDEO
