वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी 'एक हात मदतीचा', सहेली संस्थेचा पुढाकार...
मुसळधार पावसामुळे सिल्लोड तालुक्यात जवळपास 15 ते 17 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले. पुलांवरून पाणी वाहत होते. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने मका, कपाशी, सोयाबीन, मका, अद्रक यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी आकाश गुळवे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले. नुकसानग्रस्त भागाची महसूल विभागाने तसेच पीक - विमा कंपन्यांनी त्यांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन लवकरात लवकर नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचनामे करावे.
advertisement
सकाळी झोपेतून उठल्यावर अंग ठणकतं, उठावसंच वाटत नाही; नेमकं कारण काय?
तसेच तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. सिल्लोड तालुक्यात गेल्या दोन - तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत असून, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेत बुधवारी सकाळीच शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी केली आहे. अतिवृष्टीने बाधित झालेल्या गावातील शेतकऱ्यांना सत्तार यांनी भेट देत धीर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राज्य शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सत्तार यांनी म्हटले आहे.