सकाळी झोपेतून उठल्यावर अंग ठणकतं, उठावसंच वाटत नाही; नेमकं कारण काय?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
सकाळी झोपेतून उठल्यानंतर 'मॉर्निंग स्टिफनेस'मुळे मान-पाठ आखडणे, डोके आणि संपूर्ण अंग जड झाल्याचा त्रास ज्येष्ठांना होतो.मात्र आता सतत बैठे काम, जीवनशैली, व्यायाम-हालचालीचा अभाव, ताण-तणावामुळे तो ३० ते ४० दरम्यानच्या तरुणाईलाही जाणवत आहे. त्यामुळे तरुणवर्गानेही या आजाराबाबत जागृत राहणे आवश्यक आहे
सकाळी झोपेतून उठल्यानंतर \'मॉर्निंग स्टिफनेस\'मुळे मान,पाठ आखडणे, डोके आणि संपूर्ण अंग जड झाल्याचा त्रास ज्येष्ठांना होतो.मात्र आता सतत बैठे काम, जीवनशैली तसेच व्यायाम-हालचालीचा अभाव, ताण-तणावामुळे तो ३० ते ४० दरम्यानच्या तरुणाईलाही जाणवत आहे. त्यामुळे तरुणवर्गानेही या आजाराबाबत जागृत राहणे आवश्यक आहे.
नेमके हा आजार कशा मुळे होते हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
झोपेच्या ६ ते ८ तासांमध्ये शरीर जवळपास निश्चल अवस्थेत असते ज्यामुळे स्नायू आणि सांधे आखडतात. तसेच दिवसभर कॉम्प्युटरसमोर एकाच जागी बसून काम केल्याने पाठीच्या आणि मानेच्या स्नायूंवर प्रचंड ताण येतो जो सकाळी ताठरपणाच्या रूपात जाणवतो. त्याशिवाय शरीरात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी१२ आणि कॅल्शियमची कमतरता असल्यास हाडे आणि स्नायू कमकुवत होऊन सकाळी अंग जड वाटते. मानसिक ताण आणि शांत झोप न लागल्याने शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नसल्याचा थेट परिणाम स्नायूंच्या आरोग्यावर होतो.
advertisement
त्याच पद्धतीने चुकीच्या जीवनशैलीमुळे देखिक या समस्या वाढू शकतात.
सकाळी गजर वाजतो, डोळे उघडतात, पण शरीर जणू काही ऐकायलाच तयार नाही. कसेबसे झोपेतून उठल्यावर काही मिनिटांपासून ते अर्ध्या तासापर्यंत शरीर ताठर वाटण्याच्या या समस्येकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. वर्क फ्रॉम होम, बैठी जीवनशैली आणि वाढत्या ताणतणावामुळे ही समस्या आता घराघरात पोहोचली आहे. त्यामागे आपली बदललेली जीवनशैली आणि काही चुकीच्या सवयी प्रामुख्याने जबाबदार आहेत.
advertisement
हे करून बघा
या समस्येने ग्रस्त व्यक्तींनी काही सवयी बदलण्याची गरज असून त्यांना दिनक्रमाचा भाग बनवावा. सकाळी उठल्यावर अंथरुणातच हात-पाय हलकेसे ताणा. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास त्वरित मदत होते. एक ग्लास कोमट पाणी प्या आणि घरातल्या घरात ५-१० मिनिटे चाला. त्यामुळे शरीरातील ताठरपणा वेगाने कमी होतो. सकाळी घरी तर दुपारी कामाच्या ठिकाणी बसल्याजागीही मानेचे, खांद्याचे आणि पाठीचे सोपे स्ट्रेचिंग करून या समस्येपासून मुक्ती शक्य असते.
advertisement
डॉक्टरांचा सल्ला गरजेचा
बहुतेक वेळा \'मॉर्निंग स्टिफनेस\'जीवनशैलीतील बदलांनी नियंत्रणात येतो. मात्र, काही लक्षणे गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. सकाळचा हा ताठरपणा अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ टिकत असेल, सांध्यांवर सूज येत असेल, हलका ताप जाणवत असेल किंवा चालताना त्रास होत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अशी लक्षणे दिसल्यास वेळ न घालवता तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 8:02 PM IST