Pune News : वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी 'एक हात मदतीचा', सहेली संस्थेचा 26 वर्षांपासून पुढाकार
- Reported by:Niranjan Sherkar
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या बुधवार पेठेतील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी ‘सहेली’ संस्था मागील अनेक वर्षांपासून निस्वार्थपणे कार्यरत आहे. वेश्याव्यवसायातून बाहेर पडून सन्मानाने जगता यावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी या संस्थेने महिलांसाठी विविध रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या बुधवार पेठेतील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी ‘सहेली’ संस्था मागील अनेक वर्षांपासून निस्वार्थपणे कार्यरत आहे. वेश्याव्यवसायातून बाहेर पडून सन्मानाने जगता यावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी या संस्थेने महिलांसाठी विविध रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.याबाबतची अधिक माहिती सहेली संस्थेच्या कार्यकारी संचालिका तेजस्विनी सेवेकरी यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
बुधवार पेठ ही पुण्यातील सर्वात जुनी रेडलाइट एरिया म्हणून ओळखली जाते. येथे राहणाऱ्या महिलांना आयुष्यभर वेश्याव्यवसायाच्या चौकटीतच जगावे लागते, अशी परिस्थिती दीर्घकाळ होती. मात्र, ‘सहेली’ संस्थेने या महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. सहेली संस्थेत जवळपास 2000 हजार पेक्षा जात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला कार्यरत आहेत. संस्थेच्या माध्यमातून शिवणकाम, हस्तकला, पाककला, लघुउद्योग यांसारख्या प्रशिक्षणांच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
advertisement
यामुळे महिलांना घरातूनच स्वयंपूर्ण व्यवसाय करता येतो आणि त्यांना स्थिर उत्पन्नाचे साधन निर्माण होते.
संस्था केवळ रोजगारपुरतेच मर्यादित न राहता महिलांच्या आरोग्याच्या समस्या, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, मानसिक आधार या गोष्टींवरही विशेष लक्ष देते. महिलांना वैद्यकीय तपासण्या, सल्लामसलत सेवा, तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले जाते.
advertisement
या वस्तूंची महिलांकडून केली जाते निर्मिती
सहेली संस्थेत हजारो महिला उत्साहाने काम करतात.संस्थेकडून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.या महिला सुगंधी अत्तर,सुगंधी अगरबत्ती,हर्बल साबण अशा विविध गोष्टींची स्वतः निर्मिती करतात. ‘सहेली’च्या उपक्रमामुळे अनेक महिलांनी आत्मविश्वासाने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. वेश्याव्यवसायाच्या अंधाऱ्या चक्रातून बाहेर पडून त्यांनी कौशल्याधारित व्यवसाय स्वीकारले आहेत. त्यामुळे समाजातील त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हळूहळू बदलताना दिसतो.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Sep 17, 2025 8:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune News : वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी 'एक हात मदतीचा', सहेली संस्थेचा 26 वर्षांपासून पुढाकार







