भाजयुमो जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांनी खळबळजनक असे आरोप केले आहेत. ते म्हणाले की, आमदार संतोष बांगर यांच्यासह त्यांचे सहकारी राम कदम व शाम कदम यांचाही हात आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच मला मारण्याची सुपारी दिली. या प्रकरणी पोलिसांनी माझ्या ऐवजी पोलिसांच्या जबाबावरून गुन्हा का नोंद केला? गोळीबाराच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची विनंतीसुद्धा पप्पू चव्हाण यांनी केलीय.
advertisement
Nitin Desai : नितीन देसाईंनी टोकाचा निर्णय का घेतला? आमदार बालदी यांनी केला मोठा दावा
काय घडलं होतं?
पप्पू चव्हाण हे जिल्हा परिषदेत कामानिमित्त आले होते. दुपारी तीनच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या आवारात ते आले असताना दोघे जण त्यांच्या दिशेने आले. काही कळायच्या आतच त्यांच्या दिशेने हल्लेखोरांनी गोळीबार केला. यावेळी पप्पू चव्हाण खाली वाकल्याने त्यांच्या पाठीत दोन गोळ्या घुसल्या. तर दोन गोळ्या घटनास्थळी पडल्या होत्या.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर रुग्णालयासमोर पप्पू चव्हाण समर्थकांनी गर्दी केली होती.
