Nitin Desai : नितीन देसाईंनी टोकाचा निर्णय का घेतला? आमदार बालदी यांनी केला मोठा दावा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Nitin Chandrakant Desai Death : उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी देसाईंच्या आत्महत्येमागे आर्थिक अडचण हे कारण असल्याचा दावा केला आहे.
मुंबई, 02 ऑगस्ट : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओ गळफास घेत जीवन संपवलं. त्यांनी असं का केलं याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी देसाईंच्या आत्महत्येमागे आर्थिक अडचण हे कारण असल्याचा दावा केला आहे. स्टुडिओ चालत नसल्यानं ते आर्थिक अडचणीत सापडले होते असंही आमदार बालदी यांनी सांगितले.
नितीन देसाईंच्या अशा मृत्यूवर शोक व्यक्त करताना आमदार बालदी म्हणाले की, आपल्यातला एक मराठी दिग्दर्शक मोठ्या शिखरावर जातो आणि असा अंत होतो हे फार दुर्दैवी आहे. त्यांच्या आत्महत्येमागे आर्थिक कारण होतं. मागील काही दिवसांपासून स्टुडिओत शूटिंग होत नव्हतं, त्यामुळे आर्थिक चणचण होती. अनेकांशी डील केलं पण झालं नाही, म्हणूनच त्यांना हे पाऊल उचलावं लागलं असावं असं मला वाटतं.
advertisement
स्टुडिओ हा फिल्मवर चालतो. अनेक दिवसांपासून फिल्मचे शूटिंग होत नव्हते. काही मोठ्या कलाकारांशी वाद झाले होते, त्यामुळे कलाकारांनी तिथे न येण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चाही होत्या. दोन महिन्यांपूर्वी बोलणं झालं होतं तेव्हा नितीन देसाई काही चालत नाही, बऱ्याच लोकांशी बोलतोय पण कुणी यायला तयार नाही असं तो सांगायचा असंही आमदार बालदी यांनी सांगितले.
view commentsLocation :
First Published :
Aug 02, 2023 11:07 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Nitin Desai : नितीन देसाईंनी टोकाचा निर्णय का घेतला? आमदार बालदी यांनी केला मोठा दावा









