शिंदेंचा उमेदवार 100 टक्के पडणार : रामदास पाटील
युती धर्म असला तरी भाजपाची संघटन या मतदारसंघात मजबूत आहे. मी जवळपास दीड लाख मतांनी निवडून येईल ठामपणाने सांगतो, असा दुसरा कुठलाही उमेदवार ठामपणाने सांगणार नाही. बाबुराव कोहळीकर किंवा अन्य उमेदवार असता तरी ही जागा 100% जाणार हे निश्चित आहे. पक्षश्रेष्ठींनी सांगितलं तरी आता माघार नाही. आम्ही फक्त संघर्षच करायचा का? तीनही उमेदवार हे शिवसेनेतलेच आहे. यांचे यांचे राजकारण हे सेट करत आहे. त्यामुळे आमचा पक्ष आम्ही इथे वाढवायचा नाही का? हे जरी मोदींना पंतप्रधान बनवायचं म्हणत असले तरी यांची जागा पडणार आहे, मी निवडून येणार आणि मी देखील मोदींनाच मतदान करणार आहे. पक्षश्रेष्ठींची समजूत घालेल. आता हा निर्णय माझा नाही कार्यकर्त्यांचा झाला आहे. ही लढाई माझी नाही कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे आता माघार नाही, अशी भूमिका रामदास पाटील यांनी घेतली आहे.
advertisement
वाचा - सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी; अजितदादांना नवे आदेश, राष्ट्रवादी शरद पवार गटालाही समज
हेमंत पाटील यांची उमेदवारी का कापली?
उमेदवारी जाहीर करून नंतर तिकीट कापल्याबद्दल हेमंत पाटलांना नाराजी लपवता आली नाही. ते म्हणाले, "माझी पहिली भावना ही आहे की, एकतर उमेदवारी जाहीर करायला नको होती. ठीक आहे, पक्षाने उमेदवारी जाहीर केली. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. वरिष्ठांच्या, पक्षश्रेष्ठींच्या काही अडचणी असतात." याच मुद्द्यावर हेमंत पाटील पुढे म्हणाले की, "तीन पक्षांचं हे एकत्रित सरकार चालत आहे. काही तडजोडी असतात. हे करत असताना त्यांच्या एक जवळचा सहकारी या नात्याने त्यांनी मला सांगितलं की, काही अडचणी आहेत. काही गोष्टी स्वीकाराव्या लागतील. निश्चित वाईट तर वाटतंच, परंतू पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे. निश्चित ही जागा निवडून आणण्यासाठी मदत करणार आहे", असंही पाटील यांनी सांगितलं.