सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी; अजितदादांना नवे आदेश, राष्ट्रवादी शरद पवार गटालाही समज
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
राष्ट्रवादी अजित पवार गट चिन्ह वापरताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाही, असा आक्षेप घेणारा अर्ज शरद पवार गटाने दाखल केला होता, त्यावर आज सुनावणी पार पडली.
दिल्ली, पी. रामदास प्रतिनिधी : राष्ट्रवादी अजित पवार गट चिन्ह वापरताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाही, असा आक्षेप घेणारा अर्ज राष्ट्रवादी शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केला होता. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकलातील शेवटचा परिच्छेद वगळण्यात यावा यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून अर्ज करण्यात आला होता. या प्रकरणावर आज सुनावणी पार पडली. न्यायालयानं दोन्ही पक्षांचा अर्ज निकाली काढला आहे. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रवादी अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरताना हे चिन्ह न्यायप्रविष्ठ आहे आणि ते सर्वोच्च न्यायालयाच्य सुनावणीच्या आदेशाला बांधील आहे, असे प्रत्येक ठिकाणी लिहिण्याचे आदेश दिले होते. मात्र अजित पवार गटाकडून घड्याळ वापरताना कुठेही डिस्क्लेमर दिलं जात नाही, असा आरोप शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी यावेळी केला.
advertisement
दरम्यान या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयानं राष्ट्रवादी चिन्ह प्रकरणात दोन्ही बाजुंना समज दिली आहे. दोन्ही बाजुंना समज देतानाच अर्ज निकाली काढला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे काही लोक घड्याळ चिन्ह वापरत असल्याच्या आरोपावर निर्णय देताना शरद पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी चुकीचं ट्विट करू नये, म्हणत न्यायालयांन त्यांना देखील फटकारलं आहे.
advertisement
दरम्यान दुसरीकडे अजित पवारांनी मोठ्या जाहिराती द्याव्यात, त्यात चिन्ह निकालापर्यंत असेल असं ठळक लिहिवावं असा आदेशही सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे. 19 तारखेच्या आदेशात काहीच बदल केला जाणार नसल्याचंही यावेळी न्यायालयानं म्हटलं आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
April 04, 2024 2:35 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी; अजितदादांना नवे आदेश, राष्ट्रवादी शरद पवार गटालाही समज