याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगरच्या पुनर्विकासात रहिवाशांना म्हाडाकडून 1600 चौरस फूट बिल्टअप एरिया असलेली घरं दिली जाणार आहेत. त्यामुळे मोतीलाल नगरचं आधुनिक 'टाऊनशीप'मध्ये रुपांतर होणार होईल. रिअल इस्टेट क्षेत्रासाठी हा परिसर 'हॉट स्पॉट' बनणार आहे. म्हाडाकडून मिळालेल्या नवीन घरांची विक्री केल्यास किंवा घर भाड्याने दिल्यास मालकांना चांगली किंमत मिळेल. आणखी सहा-सात वर्षांनी, नव्या मोतीलाल नगरमध्ये 1600 चौरस फूट बिल्टअपच्या घराला किमान दोन ते अडीच लाख रुपये भाडं मिळेल, अशी चर्चा रिअल इस्टेट क्षेत्रात आहे.
advertisement
Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, कोकणात वेगळीच स्थिती, मुंबईसह 6 जिल्ह्यांचा हवामान अंदाज
सध्या मुंबईमध्ये 300 ते 350 चौरस फूट बिल्टअप एरिया असलेलं घर घ्यायलाही लाखो रुपये मोजावे लागत आहे. घरं घेणं अनेक सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. त्यामुळेच लोक वसई-विरार, कल्याण- डोंबिवली, बदलापूर-अंबरनाथ अशी उपनगरांमध्ये दूरवर राहायला जात आहेत. अशात गोरेगावातील म्हाडाची घरं स्थानिकांसाठी 'जॅकपॉट' ठरणार आहे. शिवाय, पुढच्या पिढ्यांसाठीही सोन्यासारखी गुंतवणूक आहे.
'म्हाडा'च्या मोतीलाल नगरमधील 1, 2 व 3 या चाळी आता जुन्या झाल्या आहेत. तेथील 3700 पेक्षा अधिक रहिवासी नव्या घरांच्या प्रतीक्षेत आहेत. या चाळींचा पुनर्विकास म्हाडा करणार असल्याने ठरवलेल्या वेळेत रहिवाशांना नवीन घर मिळणार आहे. मुंबईत आजवर कोणत्याही पुनर्विकासात रहिवाशांना एवढं मोठे घर मिळालेलं नाही.