TRENDING:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पोस्टल बॅलेट कसं वापरायचं? कोणासाठी असते ही पद्धत

Last Updated:

पोस्टल बॅलेट मतदान प्रक्रियेचा तपशील जाणून घेण्यासाठी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षक संदीप नवगिरे यांनी या प्रक्रियेबद्दल सांगितले आहे. ते कसं पार पडलं जातं, चला त्याची माहिती घेऊ

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काले-प्रतिनिधी, जालना : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. सर्वसामान्य मतदार मतदान केंद्रावर जाऊन ईव्हीएमच्या माध्यमातून आपलं मत नोंदवू शकतील. मात्र, निवडणुकीच्या कामकाजात कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक आयोगाने पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे.
advertisement

पोस्टल बॅलेट मतदान प्रक्रियेचा तपशील जाणून घेण्यासाठी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षक संदीप नवगिरे यांनी या प्रक्रियेबद्दल सांगितले आहे. ते कसं पार पडलं जातं, चला त्याची माहिती घेऊ

पोस्टल मतदानासाठी कोण असतं पात्र?

निवडणुकीच्या कामकाजात गुंतलेल्या अधिकाऱ्यांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याची संधी असते. जे अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्यावर आहेत, ते या प्रक्रियेसाठी पात्र आहेत.

advertisement

पोस्टल बॅलेटद्वारे मतदानासाठी, संबंधित कर्मचाऱ्यांना फॉर्म १२ भरावा लागतो, ज्यात वैयक्तिक माहिती भरली जाते. मतदानाच्या दिवशी त्यांना ‘सी’ नावाचे एक पाकीट दिले जाते, ज्यात ‘बी’ आणि ‘ए’ नावाची वेगवेगळी पाकिटे असतात. ‘बी’ पाकिटामध्ये घोषणापत्र भरून त्यावर निवडणूक अधिकाऱ्याची सही घेणे आवश्यक असते. ‘ए’ पाकिटात बॅलेट पेपर असतो, ज्यावर उमेदवारांची यादी, फोटो आणि चिन्ह असतात. पसंतीचा उमेदवार निवडण्यासाठी संबंधित चिन्हावर खूण करून हा बॅलेट पॅक केला जातो. शेवटी, घोषणापत्र आणि बॅलेट दोन्ही ‘बी’ पाकिटात ठेऊन स्वाक्षरी करावी लागते आणि ते टपाल पेटीत टाकावे लागते.

advertisement

पोस्टल मतदान बाद कधी होतं?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

काही वेळा घोषणापत्रावर वैयक्तिक माहिती भरूनही अधिकाऱ्याची सही घेतली जात नाही, अशावेळी ते मत बाद ठरते. तसेच, घोषणापत्र किंवा बॅलेटवर स्वाक्षरी नसेल किंवा बरोबर चिन्ह नीट पाळले नसेल, तर हे मतदान अमान्य ठरवले जाऊ शकते.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पोस्टल बॅलेट कसं वापरायचं? कोणासाठी असते ही पद्धत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल