VHA
मध्ये ऑनलाइन फॉर्म भरून मतदार यादी चेक करता येते. तसंच यात तुम्हाला मतदार नोंदणीही करता येईल. तुमचं मतदान केंद्र, तुमच्या BLO, ERO शी संपर्क साधता येईल. याशिवाय e-EPIC डाऊनलोड करण्याचीही सुविधा यामध्ये आहे.
advertisement
cVigil
निवडणूक प्रक्रियेदरम्यान कुठे उल्लंघन होऊ नये यासाठी c Vigil एप आहे. यात रेकॉर्डिंग, रिपोर्टिंग आणि समस्या सोडवणं या गोष्टी एकाच ठिकाणी होतील. १०० मिनिटांच्या टाइमलाइनवर रिस्पॉन्स मिळेल. तसंच निनावी तक्रारी देता येतील.
KYC
तुमच्या उमेदवाराबद्दलची माहिती या एपवर मिळेल. उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याला या एपवर पब्लिश करणं बंधनकारक आहे. पक्षांनाही त्यांची माहिती सार्वजनिक करणं बंधनकारक आहे.
सुविधा पोर्टल (Suvidha Portal)
अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. यासाठी सुविधा एप असून उमेदवारांना इथं त्यांच्या बैठका आणि सभांसाठी परवानगी घेऊ शकतात.