Maharashtra Elections 2024 Date : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 नोव्हेंबर रोजी निकाल

Last Updated:

Maharashtra Election 2024 Date : निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तारखा
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तारखा
नवी दिल्ली :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहे. राज्यात एका टप्यात निवडणूक आहे, होणार आहे. मतदान 20 निवडणुकीचा निकाल 23नोव्हेंबर रोजी लागणार आहे. राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार, यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक निकालांची माहिती आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे. त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत असली तरी मनसे, वंचित बहुजन आघाडी, स्वराज्य पक्ष हे काही मतदारसंघातील मतांचे गणित बिघडवू शकतात.
advertisement
2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी इंडिया आघाडीला 31 तर एनडीएला 17 जागा मिळाल्या. यामध्ये भाजपला 9, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ 1 जागा मिळाली. भाजपने 23 जागा गमावल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 41 जागा मिळाल्या होत्या.
advertisement
महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महायुतीला चांगली टक्कर दिली होती. आता विधानसभेतही हा इम्पॅक्ट पाहायला मिळणार की लाडकी बहीण योजना वरचढ ठरणार याची उत्सुकता आहे. विकास कामांचा धडाका की विरोधकांचे खडेबोल जनता कुणाला कौल देणार याचा फैसला मतदारराजा घेणार आहे.
advertisement
राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून उमेदवारी अर्ज 22 ऑक्टोबरपासून भरण्यास सुरुवात होणार आहे.

> कोणत्या टप्प्यात कुठं मतदान?

राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे.  20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.

निवडणूक निकाल? 

advertisement
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.

2019 च्या निवडणूक निकालानंतरचे पक्षीय बलाबल एकूण जागा -288

भाजप - 108
शिवसेना - 56
राष्ट्रवादी - 54
काँग्रेस - 44
बविआ - 3
मनसे - 1
एमआयएम - 2
समाजवादी पक्ष - 2
प्रहार - 2
जनसुराज्य - 1
advertisement
स्वाभिमानी शेतकरी पक्ष - 1
शेकाप - 1
रासप - 1
माकप - 1
क्रांतिकारी शेतकरी पक्ष - 1
अपक्ष - 13

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरचे संख्याबळ...

भाजप- 105
शिवसेना शिंदे - 40
राष्ट्रवादी-अजित पवार- 39
शिवसेना ठाकरे - 15
राष्ट्रवादी शरद पवार- 13

मतदारांची आकेडवारी... 

एकूण मतदार- 9 कोटी 59 लाख
advertisement
नवमतदार- 19 लाख 48 मतदार
पुरुष मतदार-4 कोटी 59 लाख
महिला मतदार -4 कोटी 64 लाख
दिव्यांग मतदार- 6 लाख 32 हजार
85 वर्षांवरील मतदार- 12 लाख 48 हजार
शंभरी ओलांडलेले मतदार- 49 हजाराहून अधिक
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections 2024 Date : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 नोव्हेंबर रोजी निकाल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement