शंखनाद..! निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट चर्चेत
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Devendra Fadanvis: महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा होताच 'आरंभ..' म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
मुंबई : सगळ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांवर केलेली पोस्ट चर्चेत आहे.
महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा होताच 'आरंभ..' म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. महायुतीच्या महत्त्वकांक्षी योजनांच्या माध्यमातून मतदार निवडणुकीत महायुतीला मतरुपी आशीर्वाद देतील, असा दावा सातत्याने फडणवीस करीत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी कार्यक्रमाला उपस्थित असताना तेथील महिलावर्ग राखी बांधतानाचे फोटो फडणवीस यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
तसेच विविध राजकीय सभांना हजेरी लावत असल्याचे फोटो आणि भाषण करीत असल्याचे फोटो व्हिडीओमध्ये दिसून येत आहेत. याचाच अर्थ पुढच्या एक महिन्यात राजकीय रणांगणात काय काय होणार आहे, याची झलक फडणवीस यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दाखवली आहे.
advertisement
फडणवीस काय म्हणाले?
लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल ! आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करू! भाजपाच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या, आणि 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या! या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा! विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय... असे फडणवीस म्हणाले.
advertisement
शंखनाद #Maharashtra #AssemblyElections2024 #Elections2024 #MaharashtraElection2024 pic.twitter.com/LdLPIlU5J9
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 15, 2024
महाराष्ट्रातील जनतेचे आणि राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेली आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात निवडणुका पार पडणार आहेत. विज्ञान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केलेली आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे.
advertisement
कधी होणार निवडणूक, निकाल कधी लागणार?
पहिला टप्प्यात २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
२२ ऑक्टोबर रोजी अधिसूचना लागू होईल.
नामांकन दाखल करण्याची मुदत- २९ ऑक्टोबरपर्यंत २०२४ रोजी असेल
दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची पडताळणी करण्याची तारीख- ३० ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस- ४ नोव्हेंबर २०२४
advertisement
मतदान कधी असेल- २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान असेल
मतमोजणी निकाल कधी असेल- २३ नोव्हेंबर नोव्हेंबर
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2024 4:33 PM IST