ऑनलाइन यादीचा उपयोग काय?
गावातील रेशन कार्ड धारकांची संपूर्ण माहिती ही आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. यामध्ये कोणाकडे रेशन कार्ड आहे, कोणत्या प्रकारचे कार्ड आहे, त्याचा लाभ कोण घेत आहे, यासह अन्य माहिती पाहता येते. यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता वाढते.
रेशन कार्ड यादी पाहण्याचे फायदे
पारदर्शकता: कोण लाभ घेत आहे, कोण नाही, याचा सहज मागोवा घेता येतो.
advertisement
दुरुस्तीसाठी मदत: चुकीची माहिती असल्यास दुरुस्तीसाठी अर्ज करता येतो.
लाभ तपासणी: आपल्या कुटुंबाला योजनेचा लाभ मिळतोय का, हे कळते.
नवीन अर्जाआधी माहिती: नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी आधीची माहिती तपासता येते.
रेशन कार्ड यादी कशी पाहाल?
सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर https://rcms.mahafood.gov.in/show_reports.aspx?RID=98 ही वेबसाइट उघडा.नंतर दिलेला कोड भरून Verify बटणावर क्लिक करा. राज्य आणि जिल्हा निवडा. जसे की, State: Maharashtra, District: तुमचा जिल्हा (उदा. पुणे, नाशिक, औरंगाबाद) नंतर Scheme मध्ये "Select All" निवडा, जेणेकरून सर्व प्रकारची यादी दिसेल. Report Name आणि Date आपोआप भरलेली असेल. नंतर View Report बटणावर क्लिक करा. तहसील आणि रेशन दुकान निवडा तहसील/तालुका आणि त्यानंतर तुमचं गाव व रेशन दुकान (FPS) निवडा. असे केल्यास तुम्हाला निवडलेल्या दुकानाशी संबंधित सर्व रेशन कार्ड धारकांची SRC नंबरसह यादी स्क्रीनवर दिसेल.
उपयुक्त हेल्पलाईन
1800-22-4950 / 1967 (BSNL/MTNL) 14445 (One Nation – One Ration Card योजना) यावर संपर्क साधा
तसेच तुम्ही Mera Ration App गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून रेशन कार्ड यादी, कार्ड डिटेल्स, दुकान शोध, व इतर माहिती मिळवू शकता.