SSC, HSC बोर्डाच्या परीक्षेत आपल्या पाल्यांना हे नक्की सांगा, पालक अन् शिक्षकांना डॉक्टरांचा सल्ला
“आम्ही इतरवेळी परीक्षा खोलीत पाणी बॉटल घेऊन जाण्याची परवानगी देत नव्हतो. पिण्याच्या पाण्याची सोय संबंधित शाळेकडूनच केली जात होती आणि विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात तहान लागल्यावर ते पाणी पिऊ शकत होते. परंतु, सध्या जीबीएसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी कोणतीही रिस्क घ्यायला तयार नसतील. ते घरचं पाणी पिण्यासच प्राधान्य देतील. त्यामुळे ही सूट देण्यात आली आहे,” असे राज्य मंडळाचे चेअरमन शरद गोसावी यांनी सांगितलं.
advertisement
दरम्यान, परीक्षा काळात घडणारे गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना यापूर्वी वर्गात पाणी बॉटल घेऊन जाण्यास मनाई होती. आता जीबीएसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. येत्या 11 फेब्रुवारीपासून बारावी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे.