इंटेलिजन्स ब्युरोने 258 एसीआयओ ग्रेड II या पदासाठी रिक्त जागांसाठीच्या भरतीची सूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 25 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2025 आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची आणि अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख एकच आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्जासाठी पात्रता निकष, रिक्त जागांबद्दलची माहिती आणि संक्षिप्त सूचनेची पीडीएफ तपासण्याची आवश्यकता आहे. भरतीबद्दलची सविस्तर माहिती बातमीत देण्यात आली आहे. त्यासोबतच इच्छूक उमेदवारांसाठी भरतीच्या अधिसूचनेची PDF देखील बातमीमध्ये देण्यात आली आहे.
advertisement
इंटेलिजन्स ब्युरोने एसीआयओ ग्रेड II पदासाठी इंजिनिअरिंग पदवी (Electronics, Electronics And Tele- Communication, Electronics And Communication, Electrical And Electronics, Information Technology, Computer Science, Computer Engineering, Computer Science And Engineering) किंवा इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी (Science with Electronics, Computer Science, Physics With Electronics Or Electronics And Communication/ Computer Applications) किंवा गेटची परिक्षा 2023, 2024, 2025 यावर्षी उत्तीर्ण असलेला हवा. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारित ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे.
- पदाचे नाव: सहायक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO-II/Tech)
- रिक्त जागा: 258
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
- निवड प्रक्रिया: कौशल्य चाचणी, मुलाखत
- वेतन: रु 44,900 – रु 1,42,400 (स्तर-7 वेतन मॅट्रिक्स)
- अधिकृत वेबसाइट: mha.gov.in
- अर्जाची लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/96338/Index.html
- जाहिरातीची पीडीएफ लिंक: https://g03.tcsion.com//per/g03/pub/726
- परीक्षेची तारीख (अंदाजित): लवकरच जाहीर केली जाईल
- वयोमर्यादा: किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 27 वर्षे
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ACIO-II/Tech रिक्त जागांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना पुढील प्रमाणे शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन (GATE कोड: EC) किंवा Computer Science आणि Information Technology (GATE कोड: CS) मध्ये GATE 2023, 2024 किंवा 2025 ची परीक्षा उत्तीर्ण हवे आहेत. शिवाय, पात्रतेचे कट- ऑफ गुण प्राप्त केलेले असावेत, शिवाय खालीलपैकी एक पात्रता असणे आवश्यक आहे.
- मान्यताप्राप्त विद्यापीठ/ महाविद्यालय/ संस्थेकडून इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, संगणक अभियांत्रिकी, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रांमधील बी.ई. किंवा बी.टेक. ची पदवी गरजेची आहे. किंवा
- मान्यताप्राप्त विद्यापीठ/ महाविद्यालय/ संस्थेकडून इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्ससह भौतिकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन या विषयांमध्ये विज्ञान पदव्युत्तर पदवी किंवा संगणक अनुप्रयोगांमध्ये पदव्युत्तर पदवी गरजेची आहे.
