महाराष्ट्रावर परतीच्या पावसाचं संकट, मंगळवारी 33 जिल्ह्यांना नवा अलर्ट
सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2025 आहे. या भरती अंतर्गत एकूण 455 पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार www.mha.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 10वी उत्तीर्ण, वाहन चालक परवाना (LMV) आणि ड्रायव्हिंगचा 01 वर्ष अनुभव असणे अनिवार्य आहे.
advertisement
भारतात सुसज्ज तंत्रज्ञानासह नव्या मेडिकोव्हर हॉस्पिटलची निर्मिती, लवकरच येणार IP
भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 27 वर्षे असणे आवश्यक आहे. वयाची गणना 10 ऑगस्ट 2025 च्या आधारावर केली जाईल. आरक्षित वर्गांना सरकारी नियमांनुसार नुसार कमाल वयमर्यादेत सूट दिली जाईल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी 5 वर्षांची सूट तर इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात येणार आहे. संपूर्ण भारतातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकणार आहेत.