TRENDING:

कोल्हापूर: 350 रुपये रेंट, कंडोमची पाकिटं अन् स्पेशल रूम, कॅफेत एन्ट्री करताच पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली

Last Updated:

इचलकरंजीतील कॅफे अड्डा येथे अश्लील आणि बेकायदेशीर प्रकार उघड; संकेत हुबळे व शैलेश चंदूरेवर गुन्हा दाखल, निर्भया पथकाची धाडसी कारवाई.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर: कॅफेच्या नावाखाली अश्लील प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात सुरू होता. इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरात असलेल्या एका प्रसिद्ध कॅफेमध्ये अश्लील आणि बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कॅफे अड्डा नावाच्या या ठिकाणावर कोल्हापूर निर्भया पथकाने अचानक छापा टाकून मोठा अश्लील कारभार चव्हाट्यावर आणला आहे.
News18
News18
advertisement

शहरात कॅफेंची संख्या वाढली असली तरी, काही ठिकाणी कॅफेच्या नावाखाली तरुण-तरुणींना आकर्षित करून हे अश्लील धंदे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या बेकायदेशीर प्रकाराची खात्री करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी निर्भया पथकातील कर्मचाऱ्याला 'तोतया ग्राहक' बनवून कॅफेमध्ये पाठवले. या कर्मचाऱ्याने कॅफेत प्रवेश करताच जे दृश्य पाहिले, ते अत्यंत धक्कादायक होते.

या कॅफेमध्ये जोडप्यांसाठी स्वतंत्र दोन रूम्स तयार करण्यात आल्या होत्या, वाढदिवस साजरा करण्यासाठी एक वेगळी रूम होती, पण सर्वात धक्कादायक म्हणजे, ३५० रुपये प्रति तास भाड्याने देऊन अश्लील चाळे करण्यासाठी एक 'स्पेशल रूम' दिली जात असल्याचे उघड झाले. या विशेष रूममध्ये आणि परिसराची झडती घेतल्यावर तिथे कंडोमची पाकिटे पोलिसांना आढळली. खात्री होताच निर्भया पथकाने कॅफेवर पूर्णपणे छापा टाकला.

advertisement

अचानक झालेल्या या कारवाईमुळे कॅफेमध्ये उपस्थित तरुण-तरुणींची एकच धांदल उडाली. गोंधळात अनेक जण बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. कारवाईदरम्यान कॅफेमध्ये काही कॉलेज विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच बाहेरगावाहून आलेले ग्राहकही उपस्थित होते. पोलिसांनी या गंभीर गैरप्रकाराची नोंद घेऊन तातडीने कॅफेवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी कॅफेचा मालक संकेत हुबळे आणि कॅफे चालक शैलेश चंदूरे यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मुंबईत बिगेस्ट बुक सेल! 100 पेक्षा अधिक स्टॉल्स, 70% पर्यंत सूट; वाचकांना लॉटरी
सर्व पहा

शहरात अशा प्रकारे कॅफेच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. इचलकरंजी शहरात ही कारवाई झाल्याची माहिती पसरताच, शहरातील अनेक कॅफे चालकांनी तातडीने गावभाग पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली. निर्भया पथकाच्या या धाडसी कारवाईमुळे शहरात सुरू असलेल्या अशा अनेक संशयास्पद कॅफे चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोल्हापूर: 350 रुपये रेंट, कंडोमची पाकिटं अन् स्पेशल रूम, कॅफेत एन्ट्री करताच पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल