TRENDING:

Ichalkaranji Election Live Update: इचलकरंजीत भाजप आणि शिवशाहू विकास आघाडी चुरशीची लढत

Last Updated:

Ichalkaranji municipal corporation Election Live Update: इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

इचलकरंजी: इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत आज गुरुवारी (१५ जानेवारी २०२६) मतदान उत्साहात पार पडले, ज्यात 70% मतदानाची नोंद झाली. सकाळी 10पासून निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. ही निवडणूक महायुती आणि शिव-शाहू विकास आघाडी यांच्यातील थेट लढतीभोवती फिरली, ज्यात 16 प्रभागातील 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणात होते.

advertisement

इचलकरंजीला २०२५ मध्ये महानगरपालिका दर्जा मिळाला, त्यामुळे ही पहिली सार्वत्रिक निवडणूक असून एकूण ६५ जागा आहेत. यापूर्वी नगरपालिका काळात (२०१८) भाजपला ५०, राष्ट्रवादील ८, काँग्रेसलाजागा मिळाल्या होत्या; अध्यक्ष अलका स्वामी (भाजप). निवडणूक प्रक्रिया डिसेंबर २०२५ पासून सुरू झाली, ज्यात ३८३ अर्जांपैकी १५३ माघार घेतल्या.

advertisement

इचलकरंजी महानगरपालिका निकालाचे Live अपडेट (Ichalkaranji Municipal Corporation Election Live Update)

-इचलकरंजीत भाजप ७, शिवेसना १ तर शिवशाहू विकास आघाडी ८ जागांवर आघाडीवर

- इचलकरंजी मोठी राजकीय घडामोड, भाजप पाठोपाठ शिव शाहू विकास आघाडीचे 4 उमेदवार विजयी

advertisement

- वॉर्ड 7 मध्ये शिव शाहू विकास आघाडीचे 4 उमेदवार विजयी

- इचलकरंजीत भाजपचे 4 उमेदवार विजयी

-इचलकरंजीत वॉर्ड क्रमांक  4 भाजपचे चारही उमेदवार 1200 ते 1400 च्या फरकाने पुढे

advertisement

- इचलकरंजीत एकाच वेळी सर्व प्रभागाची मतमोजणी सुरू

इचलकरंजी महानगरपालिकेसाठी 16 प्रभागातील मतमोजणी एकाच वेळी सुरू आहे. त्यामुळे सर्व 230 उमेदवारांचे मतमोजणीसाठीचे प्रतिनिधी एकाचवेळी केंद्रात घेतले असून सर्व मतमोजणी झाल्यानंतरच प्रतिनिधींना बाहेर सोडण्यात येणार आहे.

- इचलकरंजीत मतमोजणीला सुरुवात, पोस्टल मतमोजणी सुरु

पक्ष आणि आघाड्या

महायुतीने (भाजप ५६, शिंदे शिवसेना १०, अजितपवार राष्ट्रवादी १२) मजबूत आघाडी साधली, तर शिव-शाहू विकास आघाडीने (काँग्रेस, उद्धवसेना इ.) एकत्र येऊन लढत घेतली. शिवसेना (ठाकरे) स्वबळावर १८ जागा लढवत असून, वंचित बहुजन, परिवर्तन आघाडी यांसारख्या छोट्या पक्षांचा प्रभाव. माघारीनंतर बहुतांश ठिकाणी दुरंगी लढत राहिली.

मुख्य मुद्दे

प्रचारात पाणीटंचाई, वस्त्रोद्योग विकास, रस्ते, गटारी आणि पाणीपुरवठा हे प्रमुख मुद्दे राहिले; शहरातील सर्व भागांत पाण्याचा प्रश्न जिव्हाळ्याचा ठरला. गुन्हेगार पार्श्वभूमीचे उमेदवार आणि अपक्षांचा प्रभावही चर्चेत राहिला. मतदार यादीतील गोंधळ आणि चार मते देण्याच्या प्रक्रियेमुळे मतदानात विलंब झाला.

महत्त्वाच्या लढती

प्रभाग १३-१४ मध्ये माजी नगरसेवक आणि नातेवाईकांमधील चुरस: प्रभाग १४ 'अ' मध्ये सपना भिसे वि. कल्पना धुमाळ, 'ब' मध्ये मेघा भोसले (भाजप) वि. रागिनी मोरबाळे. प्रभाग ९ 'अ' मध्ये अब्राहम आवळे वि. रुबेन आवळे वि. इतर अपक्ष; प्रभाग ७-९ मध्ये १३ अपक्षांसह माजी सभापतींच्या लढती. मतविभागणी निकाल ठरवेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ichalkaranji Election Live Update: इचलकरंजीत भाजप आणि शिवशाहू विकास आघाडी चुरशीची लढत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल