TRENDING:

ग्राउंड खचाखच भरलं, नाशिकमध्ये राज ठाकरेंनी सभा गाजवली! पण फक्त एका शिलेदाराने मारली बाजी, आहे तरी कोण?

Last Updated:

Nashik Election 2026 : राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण करणाऱ्या ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नाशिकमध्ये भव्य सभा घेऊन वातावरण तापवण्यात आले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण करणाऱ्या ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नाशिकमध्ये भव्य सभा घेऊन वातावरण तापवण्यात आले होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले होते. मात्र, या राजकीय घडामोडीचा थेट फायदा निवडणूक निकालांमध्ये मनसेला झालेला दिसून आला नाही. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत मनसेने मोठ्या अपेक्षेने रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी केवळ एका जागेवर विजय मिळवला असून उर्वरित ठिकाणी पक्षाला पराभव स्वीकारावा लागला आहे.
Nashik Mahaplika Election 2025
Nashik Mahaplika Election 2025
advertisement

एकमेव विजय

या निवडणुकीत मनसेला मिळालेला एकमेव विजय नाशिकच्या प्रभाग क्रमांक १३ (ब) मधून झाला आहे. येथून मनसेच्या मयुरी पवार यांनी दणदणीत विजय मिळवत पक्षाचा झेंडा उंचावला आहे. संपूर्ण शहरात मनसेला केवळ एकच जागा मिळाल्याने हा विजय अधिक महत्त्वाचा मानला जात आहे.

कुठे कुणाला दिली होती संधी?  

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विविध प्रभागांमध्ये उमेदवारांना संधी दिली होती. प्रभाग क्रमांक ३१ मधील ड आरक्षित जागेवर कोंबडे सुदाम विश्राम यांना उमेदवारी देण्यात आली. प्रभाग क्रमांक १ (अ) मधून गांगुर्डे प्रिया बाळकृष्ण, तर प्रभाग क्रमांक ३ (ब) मधून मंडलिक शितल विपुल यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. याच प्रभागातील ड आरक्षित जागेवरून भवर संदीप सुभाष यांना उमेदवारी देण्यात आली.

advertisement

प्रभाग क्रमांक ४ मध्ये ब आरक्षणातून दौदे निकिता सागर, तर ड आरक्षणातून कुलकर्णी कविता हर्षल यांना पक्षाने संधी दिली. प्रभाग क्रमांक ५ (ड) मधून जाधव नवनाथ जिवराम, प्रभाग क्रमांक ७ (अ) मधून खंडाळे सत्यम चंद्रकांत, तर प्रभाग क्रमांक ८ मधील क आरक्षणातून कोरडे भाग्यश्री संतोष आणि ड-ब आरक्षणातून गुंबाडे विशाल सुरेश हे मनसेचे उमेदवार होते.

advertisement

प्रभाग क्रमांक १० मध्ये ब आरक्षणातून जाधव किरण नामदेव आणि ड आरक्षणातून शेख फरीदा सलीम यांना उमेदवारी देण्यात आली. प्रभाग क्रमांक ११ (अ) मधून भावले विशाल संपत, तर क आरक्षणातून काळे माया आणि जाधव गीता संजय हे उमेदवार पक्षाकडून उभे राहिले होते.

प्रभाग क्रमांक १२ (अ) मधून तेजाळे किशोर विनायक, प्रभाग क्रमांक १३ (ब) मधून पवार मयुरी अंकुश आणि प्रभाग क्रमांक १६ (क) मधून सहाणे मिरा बाळासाहेब यांना मनसेने निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. प्रभाग क्रमांक १८ (ब) मधून पिल्ले रोहिणी संतोष, तर प्रभाग क्रमांक २३ (ड) मधून उपासनी स्वागता रमेश यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पीक कर्ज घेणाऱ्यासाठी गुड न्यूज; मुद्रांक शुल्काचा खर्च वाचणार, कसा होणार फायदा?
सर्व पहा

प्रभाग क्रमांक २४ मध्ये ब-ड आरक्षणातून जगताप तुषार पुंडलिक, क आरक्षणातून रोजेकर सावित्री भिकन आणि दौदे संदीप गोपीचंद यांना संधी देण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक २५ मधील ड-ब आरक्षणातून पाटील राहुल सुदाम, प्रभाग क्रमांक २६ (क) मधून पवार निर्मला भास्कर आणि बगडे अर्चना ज्ञानेश्वर, तर प्रभाग क्रमांक २७ मध्ये अ आरक्षणातून मोकळ शैला दीपक, क मधून खाडम किरण गंगाराम तसेच ब आरक्षणातून कोदे श्री. सुधाकर व वेताळ वर्षा अरुण यांना उमेदवारी देण्यात आली होती.

advertisement

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ग्राउंड खचाखच भरलं, नाशिकमध्ये राज ठाकरेंनी सभा गाजवली! पण फक्त एका शिलेदाराने मारली बाजी, आहे तरी कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल