शेतकऱ्यांना पीक कर्ज मुद्रांक शुल्क माफीचा फायदा कसा?
यापूर्वी शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज घेताना विविध कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असे. कर्ज करारनामे, गहाणखत आणि इतर संबंधित दस्तऐवजांवर सरकारला मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. या तांत्रिक प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत होता आणि कर्ज प्रक्रिया वेळखाऊ ठरत होती. आता हे शुल्क माफ झाल्यामुळे कर्ज घेताना होणारा कागदपत्रांचा खर्च पूर्णपणे वाचणार आहे. विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि सोपी होणार आहे.
advertisement
पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ
आधी दोन लाख रुपयांच्या कर्जासाठी सुमारे 600 रुपयांचे मुद्रांक शुल्क शेतकऱ्यांना भरावे लागत होते. आता हे शुल्क यापुढे भरावे लागणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्ज खर्चात कपात होणार आहे.
कडाक्याच्या थंडीमुळे केळी बागेला फटका, असं करा संरक्षण, कृषी तज्ज्ञांचा सल्ला
दोन लाखांपर्यंतच्या कर्जावर सवलत
दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी शुल्क माफ केले जाणार आहे. कर्जावरील सवलत 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आली आहे. यापूर्वी शेतीच्या पीक कर्जावर प्रत्येक एक लाख रुपयांमागे 0.3 टक्के मुद्रांक शुल्क आकारले जात होते. आता ते लागणार नाही.
300 ते 600 रुपये खर्च वाचणार
कर्ज घेताना शेतकऱ्यांचा होणारा 300 रुपयांपर्यंतचा खर्च वाचणार आहे. दोन लाख रुपयांच्या कर्जावर 0.3 टक्के दराने शुल्क आकारले जायचे. शेती उत्पादन खर्च, बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचे वाढते दर लक्षात घेता हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.





