विशेष म्हणजे त्यांच्याकडे असणाऱ्या परफ्यूम्सची 12 तासाची गॅरंटी सुद्धा देत असतात. ज्यात सुगंध कमी झाल्याने ते डबलचे पैसे देखील परत करत असल्यालचे दुकान चालक मिराज यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितले आहे. त्याच बरोबर तुम्ही कुठल्याही गोष्टीचा वस्तूंचा सुगंध यांच्या कडे घेऊन या हे त्या पद्धतीचा स्प्रे किवा अत्तर तुम्हाला तुमच्या समोर बनवून देत असतात. यामुळे यांचे नाशिक मध्ये चांगलेच नाव झाले आहे.
advertisement
फक्त ७० रुपयांपासून ते तब्बल 10 ते 20 हजारापर्यंतचे अत्तर यांच्याकडे तुम्हाला मिळून जातील त्याच बरोबर सेलिब्रेटी परफ्यूमची कॉपी सुद्धा तुम्हला ओरिजनल सारखी ते ही दीर्घकाळ सुगंधाच्या गॅरंटी सोबत हे देत असतात. तुम्हला जर नाशिक मध्ये आल्यानंतर परफ्यूम किवा स्प्रे घ्यायचा असेल तर नक्की घेऊ शकता. नाशिकमध्ये हे दुकान दूध बाजार चौक मंडई, अमीन लॉजच्या बाजूला मिराज यांचे जमजम परफ्युम नावाचे दुकान आहे.