ओबीसी नेत्यांनी नागपूर येथे सरकारला धडकी भरवणारा विराट ओबीसी मोर्चा काढला होता. या मेळाव्यात विजय वडेट्टीवार यांनी अतिशय आक्रमक मांडणी केली होती. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य करतानाच राज्य सरकारवर देखील त्यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. मोर्चा झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांतच त्यांना आयकर विभागाची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
advertisement
गडचिरोलीतील एका सभेत बोलताना आपल्याला आयकर विभागाची नोटीस आल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. आयकर विभागाची नोटीस आलेली असली तरी मी मागे हटणार नाही. सरकारविरोधात पुकारलेला लढा मी सुरूच ठेवेन. माझ्यावर राजकीय सुडापोटी कारवाया करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 30, 2025 5:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काँग्रेसच्या बड्या नेत्याला आयकर विभागाची नोटीस, गडचिरोलीच्या सभेतच सांगितले
