उद्धव ठाकरेंचा घणाघात
तानाशाही आणि जुमलेबाजांच्या विरोधात लढणार. भारत माझा परिवार आहे. निवडणुकीवेळी सबका साथ सबका विकास, निवडणुकीनंतर ज्यांनी साथ दिली त्यांना लाथ आणि मित्रांचा विकास. मित्रपरिवार वाद चालू देणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.
संसदेचं अधिवेशन बोलावलं आहे. अर्ध्या रात्री घोषणा होते हे सुरू हे बंद, घाबरू नका. भयमुक्त भारतासाठी एकत्र आलो आहोत. एलपीजी २०० रुपयांनी स्वस्त केला पण २०१४ नंतर किती भाव वाढवले? 5 वर्ष लूट आणि निवडणुकीवेळी सूट. गॅस स्वस्त केला पण स्वयंपाकाच्या गोष्टी महाग, त्या गॅसवर शिजवायचं काय? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.
advertisement
समन्वय समितीची घोषणा
इंडिया आघाडीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी समन्वय समितीची घोषणा करण्यात आली.
सहसमन्वयकांची यादी
के सी वेणुगोपाल
शरद पवार
स्टॅलिन
संजय राऊत
तेजस्वी यादव
अभिषेने बॅनर्जी
राघव चड्डा
जावेद खान
लाल्लन सिंह
हेमेंत सोरेन
डी.राजा
ओमर अब्दुल्ला
मेहबुबा मुफ्ती
