गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय रेल्वेमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती केली जात आहे. आता अशातच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डने नोकरभरती जाहीर केली आहे. 15 सप्टेंबरपासून अर्ज भरण्यासाठी सुरूवात झाली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2025 इतकी आहे. अर्जदार 14 ऑक्टोबरपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज भरू शकणार आहेत. अर्ज भरण्याची पद्धत आणि अर्जाचे शुल्क भरण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे. अर्ज भरणे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरणे या दोन्हीही पद्धत अर्जदार घरबसल्या भरू शकणार आहेत.
advertisement
ट्रेन कधी येणार? कोकण रेल्वेचं नवं ॲप; प्रवाशांना मिळणार एकाच क्लिकवर अपडेट
अर्ज शुल्क उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तृतीयपंथीय, महिला, सेवानिवृत्त सैनिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय यांना 250 रूपये अर्ज शुल्क भरायचा आहे. तर खुला प्रवर्ग, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या उमेदवारांना 500 रूपये अर्ज शुल्क भरायचा आहे. अर्जदार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. फक्त एकच गोष्टीची पात्रता या नोकरीसाठी आहे. उमेदवाराचे जास्तीत जास्त 33 वर्षे वय हवं आहे, तर कमीत कमी 20 वर्षे हवं आहे. अनुसूचित जाती- अनुसूचित जमातीतील अर्जदारांना 5 वर्षे वयाची सूट आहे. तर, इतर मागासवर्गीय अर्जदाराला 3 वर्षाची सूट आहे. जाहिरातीमध्ये, परिक्षेची तारीख कळवलेली नाही.
