Kokan Railway App : ट्रेन कधी येणार? कोकण रेल्वेचं नवं ॲप; प्रवाशांना मिळणार एकाच क्लिकवर अपडेट
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Kokan Railway App : जर तुम्ही कोकणामध्ये प्रवास करत आहात आणि तुमची ट्रेन फार उशिराने धावत आहे. तर तुम्हाला फक्त एका क्लिकवर तुमच्या ट्रेनची सद्यस्थिती कळणार आहे.
कोकण रेल्वेवासीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकणामध्ये प्रवास करताना बऱ्याचदा ट्रेन फार उशिराने असतात. आता यावर रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही कोकणामध्ये प्रवास करत आहात आणि तुमची ट्रेन फार उशिराने धावत आहे. तर तुम्हाला फक्त एका क्लिकवर तुमच्या ट्रेनची सद्यस्थिती कळणार आहे. कोकण रेल्वेने नव्याने डिझाइन केलेल्या मोबाइल ॲपमधील वापरातील सुलभता, प्रवेश योग्यता आणि वैयक्तिक करणावर भर देण्यात आला आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने 'केआर मिरर' केआरसीएल मोबाइल ॲप सुरू केले आहे. मराठीसह चार भाषांत हे ॲप कार्यान्वित आहे. नव्याने डिझाइन केलेल्या मोबाइल ॲपमध्ये वापरातील सुलभता, प्रवेश योग्यता आणि वैयक्तिकरणावर भर देण्यात आला आहे. 'केआर मिरर' मोबाइल ॲपमध्ये प्रवाशांना आवश्यक प्रवासाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. सध्या तरी हे 'केआर मिरर' ॲप हिंदी आणि इंग्रजी भाषेतच सुरू आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रवासादरम्यान सुरक्षा जागरूकता मोहीम राबवणे सहज शक्य होणार आहे.
advertisement
कोकणातील विविध पर्यटनस्थळे आणि ठिकाणे यांची माहिती यामध्ये असल्याने प्रवासाचे नियोजन करणे प्रवाशांना अधिक सोप्प होणार आहे. ॲपची जोडणी कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला देण्यात आली आहे. यामुळे ॲपमधून थेट संकेतस्थळावर पोहोचणे शक्य आहे. या ॲपच्या माध्यमातून सद्यस्थितीतील रेल्वे वेळापत्रक, रेल्वे वेळापत्रकातील काही तपशीलवार पाहण्यासाठी, स्थानकासह रेल्वे गाड्यांतील केटरिंग सेवांची माहिती, महिलांसाठीच्या सुविधा, महिलांसाठी हेल्पलाइन, प्रवाशांसाठीच्या हेल्पलाइन अशा सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत.
advertisement
कोकण रेल्वेचा इतिहास, मैलाचे दगड आणि कोकण रेल्वेने केलेली कामे यांचा उल्लेख आहे. केंद्रीय माहिती सूचना प्रणाली केंद्रातून करण्यात येणाऱ्या उद्घोषणा आणि सूचना ॲपमध्ये झळकणार आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, यासह अनेक मोबाइल ॲपची निवडक वैशिष्ट्ये दिले आहेत, असे कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Location :
Maharashtra
First Published :
September 16, 2025 4:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kokan Railway App : ट्रेन कधी येणार? कोकण रेल्वेचं नवं ॲप; प्रवाशांना मिळणार एकाच क्लिकवर अपडेट