TRENDING:

Jalgaon Accident : जळगावमध्ये डोकं चक्रावून टाकणारा अपघात, ST बसचा टायर फुटला..., मग प्रवाशी महिला चाकाखाली कशी आली?

Last Updated:

जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. पहिल्यांदा या एसटी बसचा टायर फुटला त्यानंतर ही बस जाऊन एका भिंतीवर आदळली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
jalgaon accident
jalgaon accident
advertisement

Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. पहिल्यांदा या एसटी बसचा टायर फुटला त्यानंतर ही बस जाऊन एका भिंतीवर आदळली होती. या दरम्यान एक महिला प्रवासी बसमधून बाहेर फेकली गेली आणि याच महिलेचा नंतर बसच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नशिराबाद टोलनाक्यावर ही घटना घडली आहे.या घटना पाहून अनेकांच डोकं चक्रावलं आहे. तसेच परिसरात खळबळ माजली आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या नशिराबाद टोलनाक्यावर ही घटना घडली आहे. अमळनेर आगाराची ही बस भुसावळच्या दिशेने निघाली होती. या दरम्यान नशिराबाद टोलनाक्यावर भरधाव वेगात असणाऱ्या एसटी बसचा टायर फुटला होता आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.त्यामुळे बस जाऊन टोलनाक्या जवळीत भिंतीवर जाऊन आदळली होती. या अपघातात बसमधील महिला प्रवासी ही बाहेर फेकली गेली होती. त्यानंतर हीच महिला बसच्या मागच्या खाली आणि तिचा बसखाली चिरडून मृत्यू झाला होता.या घटनेने परिसरात खळबळ माजली होती.

advertisement

या घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरीक घटनास्थळी दाखल झाले होते. यातील काहींनी तत्काळ मदतकार्य सुरू केले होते. तसेच घटनास्थळी पोलीसही दाखल झाले आहेत आणि त्यांनी घटनेची चौकशी सूरू केली आहे. या घटनेतील मृत महिलेची नाव अद्याप कळू शकलेले नाही आहे. पण या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एस्थेटिक सिरेमिक कप, 250 रुपयांत करा खरेदी, मुंबईतील हे सर्वात स्वस्त मार्केट
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon Accident : जळगावमध्ये डोकं चक्रावून टाकणारा अपघात, ST बसचा टायर फुटला..., मग प्रवाशी महिला चाकाखाली कशी आली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल