भडगाव तालुक्यातील कजगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कनाशी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या गावात महाले कुटुंबिय राहतात. महाले हे पाचोरा आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या मुलाचा हा दुदैवी अंत झाला आहे.त्याच झालं असं की महाले यांचा चिमुकला हा शाळेत जाण्यासाठी तयारी झाला होता. शाळेचा गणवेश घालून घराच्या ओट्यापर्यंत पोहोचला होता. त्यावेळी शेतात असलेली सायकल घेऊन शाळेत जावे,असा मनात त्याच्या विचार आला आणि तो थेट शेतात गेला.
advertisement
शेतात पोहोचताच एका सिमेंटचा पोल या बालकाचा अंगावर कोसळला. या घटनेमुळे त्याचा जागीच अपघाती मृत्यू झाला. या घटनेची माहिती इतर शेतकऱ्यांना कळताचत त्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली आणि चिमुकल्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याआधीच त्याची प्राणज्योत माळवली होती.
विशेष म्हणजे या चिमुकल्याचा आता दोन दिवसांवर म्हणजेच 30 नोव्हेंबरला वाढदिवस होता. पण त्याआधीच त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने महाले कुटुंबिय आणि गावात शोककळा पसरली आहे.
