जळगावमध्ये एकूण 11 लाख 65 हजार 968 मतदान झालं होतं. यातील 10 लाख 29 हजार 717 मतमोजणी झाली आहे. तर, 1 लाख 36 हजार 251 इतकी मतमोजणी बाकी आहे.
Nandurbar Loksabha Result : नंदुरबारमध्ये भाजपला धक्का! हीना गावितांची हॅट्रिक चुकली, पाडवींचा विजय
जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यावेळी या मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ या महायुतीच्या उमेदवार होत्या. तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली. मागील 20 वर्षांपासून जळगावात भाजपचाच खासदार आहे. आता यंदाचं या लोकसभा मतदारसंघातील चित्रही समोर आलं आहे. भाजपने आपला गड राखला आहे.
advertisement
खासदार उन्मेष पाटील यांचं बंड -
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करताच भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी बंड पुकारलं होतं. उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांनतर उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपमधून बाहेर पडलेले करण पवार यांना जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली. उन्मेष पाटील यांनी करण पवार यांना पाठींबा दिला. त्यामुळे जळगावात भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. मात्र, तरीही भाजपचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे