खासदार उन्मेष पाटील यांचं बंड -
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करताच भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी बंड पुकारलं. उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांनतर उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपमधून बाहेर पडलेले करण पवार यांना जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली. उन्मेष पाटील यांनी करण पवार यांना पाठींबा दिला. त्यामुळे जळगावात भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. यामुळे इथे यंदा भाजपचं कमळ फुलणार की शिवसेनेची मशाल पेटणार, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
मतदानाचा टक्का वाढला -
जळगाव लोकसभेसाठी यंदा एकूण 57.70 टक्के मतदान झालं. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 56.11 टक्के इतकी होती. यंदाच्या निवडणुकीत वाढलेल्या मतदानाचा टक्का कोणाला फायदेशीर ठरला, हे आता समोर आलं आहे.
