मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये अपक्ष उमेदवाराने शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांला मारहाण केल्याची घटना घडली आहे. वसंत सोनवणे असे या मारहाण झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचे नाव आहे. मारहाणीच्या या घटनेत वंसत सोनवणे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेनंतर त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.
advertisement
मी रस्त्यावरून जात होतो, पण मध्येच गोंधळ पाहून मी तिकडे काय घडलंय पाहायला गेलो, यावेळी खिशात हात घालून मोबाईल काढला,पण त्यांना वाटलं मी रेकॉर्डींग करतोय म्हणून तिथून पियुश नरेंद्र पाटील,योगेस निंबाळकर यांसह तिघांनी मला बुक्क्यांनी मारहाण करायला सूरूवात केली.मी त्यांना काय बोललो नाही आणि काय केलं नाही, तरी देखील मला मारहाण झाल्याचा आरोप वंसत सोनवणे यांनी केला आहे.
मी गर्दी पाहून पाहायला गेलो होतो आणि सहा जणांनी माझ्यावर हल्ला केला होता.नरेंद्र भास्करच्या मुलांनी म्हणजेच पियुष पाटील जो निवडणुकीत उभा आहे,त्यांनी मला मारहाण केली असा आरोप वंसत सोनवणे यांनी केला आहे. ही आरआर शाळेच्या मेडीकलजवळ घटना घडल्याचेही वसंत सोनवणे यांनी सांगितले आहे.
दरम्यान या प्रकरणात अद्याप तरी तक्रार दाखल झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही आहे. पण या प्रकरणात वसंत सोनवणे यांनी न्यायाची मागणी केली आहे.
