कपडे वाळत घालताना विजेच्या तारेला स्पर्श
मुस्लिम धर्मगुरू शाबीर खान यांची मुलगी आलिया ही घराच्या छतावर कपडे वाळत घालत असताना समोरील उच्च-दाबाच्या तारेला स्पर्श होऊन ती विजेच्या तारेला चिकटली. तिला वाचवण्यासाठी शाबीर खान आणि त्यांची भाची मारिया खान छतावर गेले असता दोघांनाही जोरदार विद्युत धक्का बसला.
रुग्णालयात कुटुंबीयांचा काळीज चिरणारा आक्रोश
advertisement
यात शाबीर खान आणि त्यांची मुलगी आलिया यांचा जागीच मृत्यू झाला, तर भाची मारिया खान ही गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. यावेळी रुग्णालयात कुटुंबीयांचा काळीज चिरणारा आक्रोश होता.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
December 05, 2025 3:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कपडे वाळत घालताना विजेच्या तारेला स्पर्श, मुलीला वाचवायला वडील धावले, दोघेही जागीच गेले
