कल्पेश वाल्मिक इंगळे (वय १५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. कल्पेश हा सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत आल्यानंतर दुपारच्या सुट्टीत मैदानात विद्यार्थ्यांसोबत खेळत असताना अचानक कोसळल्याने कल्पेशला शिक्षकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. गेल्या काही दिवसांपूर्वी कल्पेशचे शाळेत काही विद्यार्थ्यांसोबत वाद झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मारहाणीत कल्पेशचा मृत्यू झाल्याचा आरोप कल्पेशच्या नातेवाईकांनी केला.
advertisement
नातेवाईकांच्या आरोपानंतर, कल्पेशचा त्याच्याच वर्गातल्या दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत झालेल्या भांडणात मारहाणीदरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कल्पशचे शवविच्छेदन, त्याच्या कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारला
शाळेत खेळत असताना कल्पेशचा त्याच्याच वर्गातल्या विद्यार्थ्यासोबत वाद झाला. या वादातून झालेल्या मारहाणीत कल्पेश याचा मृत्यू झाला झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 22 तासानंतर आज मयत कल्पशचे शवविच्छेदन करून त्याच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
शाळा व्यवस्थापनाची देखील चौकशी केली जाणार
शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापनाविरुद्ध देखील कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी मयत कल्पेश याच्या पालकांनी केली आहे. शाळा व्यवस्थापनाची देखील चौकशी केली जाणार असून चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी सांगितले.
