याबाबत मिळालेली माहिती अशी की, महालखेडा इथं राहणारी ३८ वर्षीय महिला शेतात सकाळी काम करायला गेली होती. काम आटोपून घरी परतत असताना त्यांची हत्या करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. महिला घरी न परतल्याने कुटुंबियांनी शेतात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून हत्या केल्याने महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होता.
advertisement
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेसोबत एका पुरुषाचे अनैतिक संबंध होते. त्याच मुद्द्यावरून महिलेसोबत त्याचा वाद व्हायचा. वादातूनच त्याने दगडाने ठेचून आणि शरिरावर, गळ्यावर धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
गुजराती शिक्षकाच्या फोनमध्ये सापडले 45 अश्लील व्हिडीओ; दुष्कृत्यांचं करत होता रेकॉर्डिंग!
गुजरातमधल्या एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात संबंधित शिक्षकाविरोधात आणखी एक एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्याच्या फोनमध्ये 45 अश्लील व्हिडिओ सापडले असून, त्यावरून या शिक्षकाने अनेक विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचं स्पष्ट झालं आहे. यापैकी 12 व्हिडिओत तर हा शिक्षक स्वतः मुलींचं लैंगिक शोषण करताना दिसला आहे. याबाबत पॉक्सो न्यायालयात खटला सुरू आहे. गुजरातमध्ये अलीकडच्या काळातली अशा प्रकारची दुसरी घटना आहे.
