यावर्षी कापसाची आवक कमी आहे. निसर्गाचा लहरीपणा हा शेतकऱ्यांना उत्पन्नात घट देऊन गेला आहे. कापसाचे उत्पादन कमी असले तरी भाव मात्र गडगडतच आहे. गेल्या जानेवारीच्या तुलनेत १८०० रुपयांनी झालेली दरातील घसरण चिंतेची बाब आहे. शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
तीन वर्षापूर्वी कापसाने दहा हजारी आकडा गाठला होता. गत दोन वर्षांपासून कापसाचे भाव वाढतील म्हणून कापसाचा साठा केला. भाव तर वाढले नाहीत उलट साठा केलेल्या कापसाचे वजन कमी झाले. असा दुहेरी फटका बसला आहे. यातून सावरण्यासाठी सरकारकडून मदतीची अत्यंत गरज आहे.
advertisement
मंदी पाहता आता पुन्हा कापूस साठा करणे परवडण्यासारखे नसल्याचे जाणकार म्हणतात. इकडे मात्र जिवाचे रान करून, कर्जाच्या ओझ्याखाली दाबले जात असताना कापूस पीक घेतले. दरवाढ झाली तर लोकांचे देणे देता येईल या भावड्या आशेवर शेतकरी आहेत.
