TRENDING:

जळगावात पहाटे मर्डरचा थरार, दबा धरलेल्या 7 जणांचा तरुणावर हल्ला, धारदार शस्त्रांनी केलं रक्तबंबाळ

Last Updated:

Crime in Jalgaon: जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका २६ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका २६ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रात्रभर लाईट नसल्याने तक्रार करण्यासाठी संबंधित तरुण एमएसईबी कार्यालयाजवळ आला होता. यावेळी सहा ते सात हल्लेखोरांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका भयंकर होता, की त्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला आहे.

advertisement

विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची असं हत्या झालेल्या २६ वर्षीय तरुणाचं नाव आहे. सहा ते सात जणांनी सोमवारी पहाटे तीक्ष्ण हत्यारांनी वार करत विशालचा जीव घेतला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला? हे अद्याप समोर आलं नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

advertisement

पहाटे नेमकं काय घडलं?

२६ वर्षीय विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची या तरुणाची पहाटे जळगाव शहरातील बेंडाळे चौकातील एमएसईबी कार्यालयाजवळ निर्घृण हत्या करण्यात आली. परिसरातील लाईट गेल्यामुळे विशाल पहाटे ३ वाजेच्या सुमारास आपल्या दोन मित्रांसमवेत एमएसीबीच्या कार्यालयात तक्रार देण्यासाठी जात होता. त्याचवेळी एमएसईबी कार्यालयाच्या जवळच ६ ते ७ अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करून त्याला ठार केले.

advertisement

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन तो विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. विशाल मोची याच्या हत्येचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान मयत विशालच्या नातेवाईकांनी आरोपींना अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण होते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
जळगावात पहाटे मर्डरचा थरार, दबा धरलेल्या 7 जणांचा तरुणावर हल्ला, धारदार शस्त्रांनी केलं रक्तबंबाळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल