एक बाईकस्वार तरुण भुसावळ शहराजवळ तापी पुलाच्या अलीकडे कामासाठी जात होता. योगेश सोनवणं असं त्याचं नाव. यावल रोडवर गोदामाजवळ असताना त्याच्या बाईकमधून अचानक धूर येऊ लागला. त्याने लगेच गाडी थांबवली. गाडीवरून उतरून गाडीतून धूर कसा येत आहे हे तो तपासत होता, तोच दुचाकीनं पेट घेतला. बाईकला आग लागताच तरुण बाईकपासून दूर पळाला. रस्त्याच्या कडेला त्याने धाव घेतली.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली. तरुण वेळीच बाईकवरून उतरला आणि बाईकपासून दूर झाला म्हणून तो वाचला. काळ आला होता पण वेळ नाही, याचाच प्रत्यय या घटनेतून येतो आहे. दैव बलवत्तर होतं म्हणून मृत्यूच्या दाढेतून हा तरुण बचावला आहे.
advertisement
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Mar 09, 2024 8:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
दैव बलवत्तर म्हणून...! संपूर्ण बाईक पेटून खाक, बाईकचालकाला काहीच झालं नाही; थरारक VIDEO
