एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी गेल्याने सातपुड्याच्या पर्वतरांगात वसलेल्या आदिवासी पाड्यांवर दुःखाचं सावट पसरलं आहे. अचानक आलेल्या वादळामुळे भयभीत झालेले आदिवासी बांधव सैरावैरा पळू लागले. त्यातच जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेले नानसिंग पावरा व त्यांचे कुटुंबीय यांच्यावर घर कोसळले. अशा परिस्थितीतही त्यांना बचावासाठी परिसरातील बांधव धावले. मात्र, त्यातील दहा वर्षीय मुलाला वाचवण्यात स्थानिकांना यश आले असले तरी मात्र नानसिंग पावरा त्यांची पत्नी व दोन लहान मुलं यांचा गुदमरून मृत्यू झाला.
advertisement
मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवलं
दहा वर्षीय शांतीलाल पावरा हा दहा वर्षे मुलगा या घटनेत बचावला असला तरी मात्र त्याचा मायेचा निवारा हा कायमचा हरपला आहे. त्यामुळे निसर्गाच्या कोपामुळे अनाथ झालेल्या शांतीलाल पावरा या बालकाची जबाबदारी शासनाने स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी विकास मंडळातर्फे या बालकाला दत्तक घेऊन त्याच्या शैक्षणिक व संपूर्ण विकासासाठी आदिवासी विकास महामंडळच त्याचे पालकत्व घेणार आहे.
या घटनेनंतर वनविभागाच्या वतीनेही आदिवासी पाडे वस्त्या या ठिकाणी रस्ते व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जाणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता 4 जणांचा बळी केल्यानंतर किमान शासनाला जाग आली असून आदिवासी पाडे व वस्त्यांवर विकासात्मक कामे कधी सुरू होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. थोरपाणी पाड्यावर घडलेल्या घटनेनंतर स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली. आदिवासी पाड्यांच्या विकासासाठी शासनामार्फत योग्य उपाय योजना व नियोजन केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. आमदार संजय सावकारे यांनी घटनास्थळाची पाहणी करून न्यूज एटीन लोकमतशी बोलताना ही माहिती दिली आहे.
वाचा - रेमल चक्रीवादळ मध्यरात्री धडकणार ; मुंबईवर जमले काळे ढग, हवामान विभागाचा रेड अलर्ट
यावल वनविभागातील सातपुड्याच्या पर्वतरांगात आंबा पाणी या गावातील थोर पाणी इथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेच्या कव्हरेज करताना प्रथमच न्यूज 18 लोकमतची टीम ही घटनास्थळी पोहोचली. मात्र, या ठिकाणी पोहोचण्यासाठी अत्यंत कठीण पहाडातून मार्ग काढत जात असताना आमच्या प्रतिनिधींचा अपघातही झाला. मात्र, अपघाताला न जुमानता दुर्दैवी घटनेची सत्य परिस्थिती व घटनेला जबाबदार याचा संपूर्ण लेखाजोखा समोर यावा यासाठी अपघातानंतरही न डगमगता आमचे प्रतिनिधी या पाड्यावर पोहोचले. जखमी अवस्थेत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत शेवटच्या स्तरापर्यंत न्यूज 18 लोकमत सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हणत आमदार संजय सावकारे यांनी न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींचे व धाडसाचे कौतुक केले.