याबाबत जामनेर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापूर पुरा येथे राहणारी छत्तीस वर्षीय महिला संगीता शिंदेचे आरोपी किरण कोळी उर्फ लहान यासोबत अनैतिक संबंध होते. मयत महिलेचे पती यांचं काही वर्षांपूर्वी निधन झालेलं होतं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मयत महिला ही सध्या एकटी राहत असून तिचे किरण कोळी नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते.
advertisement
संगीता आणि किरण यांच्यात सकाळी वाद झाला आणि त्यानंतर मयत महिला आरोपीच्या आईला शिवीगाळ करू लागली. त्यामुळे चिडलेल्या किरणने संगीताला लाकडी काठीने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर तिच्या डोक्यात दगडाने वार करत हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांकडून पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी किरण माळी ला ताब्यात घेतली आहे. पुढील तपास जामनेर पोलीस हे करीत आहे.
