घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शनिपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका भागात गेल्या 8 महिन्यांपासून वेळोवेळी एका अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार २८ जून रोजी उघडकीस आला आहे. सायत असित पांडा (वय २०, पश्चिम बंगाल) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचं नाव आहे.
आरोपीने पीडित मुलाचे काही फोटो मोबाइलमध्ये घेतले होते. त्यानंतर हे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देत, आरोपीनं या अल्पवयीन मुलावर गेल्या ८ महिन्यांपासून वेळोवेळी अनैसर्गिक अत्याचार केला.
advertisement
त्यानंतर पीडित मुलाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर वेगवेगळे अकाऊंट तयार करून व्हायरल केले. २८ जून रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुरुवारी पीडित मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून सायत पांडावर शनिपेठ पोलिस ठाण्यात भादंवि अंतर्गत कलम ५०६, ३७७, ५०० पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे करीत आहेत.
