घटनेबाबत अधिक माहिती अशी की, फेकरी शिवारातील दीपनगर प्रकल्पाच्या मोकळ्या जागेत शिवरोडजवळ एक जुगाराचा अड्डा आहे. तेथे भावेशचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती भीम आर्मीचे गणेश सपकाळे यांना मिळाली. त्यांनी भावेशच्या भावाला संपर्क साधला. त्याने घटनास्थळ गाठल्यावर मृतदेह भावेशचा असल्याचे समोर आले.
यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात करून संशयीत आरोपीचा शोध घेतला. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. रोशन हुसळे असं या संशयीत आरोपीचं नाव आहे. त्याने भावेशवर दगड आणि चाकून वार केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
advertisement
Location :
Bhusawal,Jalgaon,Maharashtra
First Published :
January 14, 2024 8:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
जुगार अड्ड्यावर गेलेल्या तरुणासोबत घडला भलताच प्रकार, गमवावा लागला जीव; जळगाव हादरलं
