सुभान शेख भिकन कुरेशी असं अटक केलेल्या आरोपी जावयाचं नाव आहे. आरोपी सुभान याने आपल्या सख्ख्या आणि मामे सासऱ्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात मामे सासऱ्यांचा मृत्यू झाला. तर सख्ख्या सासऱ्यांवर उपचार सुरू आहेत. ही घटना भुसावळ शहरातील अयान कॉलनी परिसरात घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जावई सुभान शेख भिकन कुरेशी याचे पत्नीसोबत वाद सुरू होते. याच वादात मध्यस्थी करण्यासाठी विवाहितेचे वडील (सख्खा सासरा) आणि मामे सासरा आले होते. याचवेळी जावयाने रागाच्या भरात दोघांवर प्राणघातक हल्ला केला.
advertisement
या हल्ल्यात मामे सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर सख्खा सासरा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण रुग्णालयात जाताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मामे सासऱ्याला मृत घोषित केले, तर सख्ख्या सासऱ्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी जावई सुभान शेख याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.