घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगावातील मेहरुण परिसरातील मंगलपुरीत गल्लीत आपल्या घरासमोर उभा राहून गप्पा मारणाऱ्या 5 महिलांसह 2 चिमुरड्यांना भरधाव कारने जबर धडक दिली. या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडाला आहे.
या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून, चार महिला जखमी झाल्या आहेत. महिलेच्या हातात असलेल्या चिमुकल्यालाही दुखापत झाली आहे. सुदैवानं हा चिमुकला थोडक्यात बचावला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या अपघातग्रस्त गाडीचा चालक जमावाच्या हाती लागल्यानं त्याला चांगलाच चोप देण्यात आला आहे. या अपघातामधील जखमी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
शोभा रमेश पाटील (वय 60) असे या अपघामधील मृत महिलेचं नाव आहे. तर संगीता प्रकाश महाजन (वय ४८), जयश्री जगदीश राऊत (वय ३०), सुमनबाई साहेबराव पाटील (वय ६५), अर्चना पाटील (वय ४०) या महिला जखमी झाल्या आहेत. .या अपघातामध्ये दोन लहान मुलं देखील जखमी झाले आहेत.
