जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने माजी खासदार उन्मेश पाटील यांना विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मंगेश चव्हाण यांच्याविरोधात दोन हात करतील.
उन्मेश पाटील हे एबी फॉर्म घेऊन मुंबईहून चाळीसगावकडे रवाना, सूत्रांची माहिती
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उन्मेश पाटील हे एबी फॉर्म घेऊन मुंबईहून चाळीसगावकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा लवकरच पक्षाकडून होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
उन्मेश पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी, शरद पवार गटाचे राजीव देशमुख नाराज, बंड करणार?
दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कमालीचा नाराज झाला आहे. उन्मेश यांच्या उमेदवारीमुळे माजी आमदार तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजीव देशमुख हे बंड करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजीव देशमुख यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केली होती.
