जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द या गावातील स्मशानभूमी पर्यंतचा रस्ता हा चिखलमय झाला आहे.त्यामुळे गावात कुणाचाही मृ्त्यू झाला तर स्मशानभूमीपर्यंत चिखल तुडवत अंतयात्रा न्यावी लागते. नुकताच एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर अशाप्रकारे नागरीकांना अंतयात्रा न्यावी लागली होती. त्यामुळे अंतयात्रेसाठी आलेल्या नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होतोय.
पिळोदा खुर्द या गावात गावापासून सुमारे सातशे मीटर लांबीवर गावातील स्मशानभूमी आहे.गावात कोणाचाही मृत्यू झाल्यानंतर गावातून स्मशानभूमीपर्यंत अंतयात्रा काढली जाते. दरम्यान या स्मशानभूमीपर्यंतचा संपुर्ण रस्ता हा कच्चा आहे. आणि दर पावसाळ्यात या ठिकाणी अंतयात्रा काढताना नागरिकांना प्रचंड यातना सहन कराव्या लागतात . कारण या स्मशानभूमीच्या रस्त्यावर पुढे नागरिकांचे शेती क्षेत्र असल्यामुळे शेतशिवारात येणारी जाणारी वाहनांमुळे हा कच्चा रस्ता चिखलमय होतो आणि या रस्त्यावर प्रचंड मोठ मोठ्या चाऱ्या पडतात.
advertisement
दरम्यान गावातील एका वृद्धाचा मृत्यू झाला होता.त्यामुळे गावकऱ्यांना अंत्ययात्रा काढताना चिखल तुडवत जावे लागले होते.यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यात चिखल त्याचप्रमाणे चिखलात पडलेल्या चाऱ्या याच्यातून मार्ग शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली.तर अंतयात्रेसाठी गावासह बाहेरगावाहून आलेल्या नातलगांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता.
या गावातील स्मशानभूमीचा हा रस्ता दुरुस्त केला जावा व किमान काँक्रिटीकरण या रस्त्याचे व्हावे अशी फार पूर्वीपासून या गावातील नागरिकांची मागणी आहे.मात्र या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यात अशा पद्धतीने अंतयात्रा नेतांना चिखलातुन मार्ग शोधने न्यावे यापेक्षा वेदनादायी काहीच नाही असे नागरिकांनी याप्रसंगी सांगितले . तातडीने हा रस्ता केला जावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.