महापालिका आयुक्तसारख्या प्रतिष्ठित पदावरील अधिकाऱ्याने लाच स्वीकारल्याची जालना शहरातील ही पहिलीच घटना आहे. संतोष खांडेकर हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी आहे. तब्बल सहा वर्ष पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी चंद्रपूर आणि यवतमाळ या ठिकाणी सेवा बजावली आहे. यानंतर ते एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत आले. 2022 मध्ये जालना नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी म्हणून नियुक्त झाले.
advertisement
तर 2023 मध्ये जालना शहर महानगरपालिका झाल्यानंतर त्यांना पालिका आयुक्तपदी बढती मिळाली. संतोष खांडेकर यांच्या विषयी सर्वसामान्य नागरिक आणि ठेकेदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष होता. अँटी करप्शन चा सापळा यशस्वी झाल्यानंतर कार्यालयाबाहेर वाजलेली फटाके त्याचीच साक्ष देतात. दरम्यान 17 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आरोपी संतोष खांडेकर यांना जालना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी पक्षाने पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
न्यायालयाने संतोष खांडेकर यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 18 ऑक्टोबर रोजी आरोपी खांडेकर याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.. आगामी काळात तपासाची चक्री कशा पद्धतीने फिरतात आणि कोण कोणत्या नाविन्यपूर्ण गोष्टी समोर येतात हे पाहणं औत्सुक्याचा असणार आहे.