श्वेता सोळंके या मूळच्या जालना जिल्ह्यातील गोंदिया गावच्या रहिवाशी. त्यांचे वडील 1991 मध्ये जालना शहरांमध्ये स्थायिक झाले. त्यांचं दहावीपर्यंतचे शिक्षण सेंट जॉन या जालना शहरातील शाळेत झालं. बारावीपर्यंतचे शिक्षण बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात घेतलं. यानंतर तिरुपती येथे बीबीए कलेनरी आर्टमध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. यानंतर त्यांनी एक वर्ष मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम केलं. सध्या त्या मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून ट्रेनिंग घेत आहेत.
advertisement
लहानपणापासूनच त्यांना स्वयंपाक करण्याची आवड होती. त्यामुळे त्या वेगवेगळ्या पाककृती घरीच तयार करायच्या. एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना मुंबई येथील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षणासाठी नेलं. यानंतर त्यांनी व्यावसायिक दृष्ट्या या व्यवसायाकडे पाहण्यास सुरुवात केली. ज्या पंचतारांकित हॉटेलला भारतीय संघासाठी जेवण बनवण्याचं काम मिळालं होतं तिथेच श्वेता सोळंकी या काम करत होत्या. यामुळे योगायोगाने त्यांना ही संधी मिळाली. भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर सर्व खेळाडूंनी श्वेता यांनी बनवलेल्या स्वयंपाकाचे आणि त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केलं. भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडू या अतिशय प्रेमळ होत्या. अनेकदा त्या स्वयंपाक करण्यात देखील आमची मदत करायच्या, अशी भावना श्वेता यांनी लोकल 18सोबत बोलताना व्यक्त केली.