राज्यभरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. मराठवाड्यात आणि विशेष करून जालना जिल्ह्यातील मागील काही दिवसांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. त्यामुळे अन्नधान्याची नासाडी झाली.
हातावर पोट असणारे अनेक कुटुंब उघड्यावर आली. शहरातील बुरानगर, भीमनगर, दुखी नगर अशा वस्त्यांवरील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने व अन्नधान्याची नासाडी झाल्याने त्यांची चुल कशी पेटणार असा प्रश्न निर्माण झाला होता.
advertisement
हीच बाब लक्षात घेऊन जालना तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला आहे. शहरातील डबल 200 कुटुंबांना तीन किलो तांदूळ आणि पाच किलो गहू अशी राशींची किट गरजू कुटुंबांना देण्यात येत आहे. तहसीलदार छाया पवार यांच्या पुढाकाराने तहसील ऑफिस मधील कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने व स्वखर्चातून वर्गणी जमा करून मदतीचा हात पुढे केला आहे.
केवळ गरजू व्यक्तींनाच मदत मिळावी. असा आमचा उद्देश आहे. तीन किलो तांदूळ आणि दोन पाच किलो गहू अशा जवळपास 200 किट आम्ही तयार केले असून जे जे गरजू आहेत त्यांनी तहसील कार्यालयात येऊन या किट घेऊन जाव्यात असा आवाहन जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांनी केला आहे.