बदनापूर येथील श्रीराम जिनिंग येथे ऑटो रिक्षा चालकाला थांबवून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश शशिकांत ढिलपे यांनी कारवाई टाळायची असेल तर महिन्याला 300 रुपये याप्रमाणे हप्ता द्यावा लागेल असे सांगितले. तेव्हा तक्रारदाराने सध्या आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. तेव्हा उद्या बस स्टँड इथे पैसे आणून द्यावे लागेल असे ढिलपे यांनी सांगितले.
advertisement
तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांना याबाबत कळवले. बदनापूर येथील नवीन बस स्टँड इथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. दोन रिक्षा चालकांचे प्रत्येकी 300 रुपये असे एकूण 600 रुपये लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश ढिलपे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपी यांची अंगझडती घेतली असता त्यामध्ये ओप्पो कंपनीचा मोबाईल, चलन करण्याची सरकारी मशीन, 9500 रोख रक्कम आणि लाचेची 600 रुपये रक्कम मिळून आली. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान, PSI (पोलीस उपनिरीक्षक) चा पगार अंदाजे 38,600 ते 1,22,800 प्रति महिना असतो. यासोबत ग्रेड पे ( 4300 -4400) आणि इतर भत्तेही मिळतात. यामध्ये मूळ वेतन, महागाई भत्ता आणि निवासस्थानासाठी भत्ता यांसारख्या घटकांचा समावेश असतो.






