मराठवाड्यात पडत असलेली थंडी ही सामान्य आहे आणि आपल्या उपयोगाची आहे. यंदा पाऊस लांबला आणि नंतर उशिरा थंडीला सुरुवात झाली. परंतु नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात दक्षिण भारतात निवार नावाचे वादळ आले. या वादळाचा प्रभाव कन्याकुमारी, तामिळनाडू, श्रीलंका, पुद्दुचेरी आणि आंध्रप्रदेश असे सरकत पुढे गेले.
Success Story : नोकरीत मन रमले नाही, 2 मैत्रिणींने सुरू केला स्ट्रीट फूड व्यवसाय, एकदा कमाई पाहाच
advertisement
यामुळे चार ते पाच दिवस काहीशी थंडी कमी झाली होती. वादळ पुढे सरकताच पुन्हा उत्तरेकडून वारे यायला लागले आणि थंडी वाढण्यास सुरुवात झाली. तापमान अगदीच 5 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झालं तर आपण त्याला असामान्य म्हणू शकतो. मात्र सध्या तशी परिस्थिती नाही. पुढील तीन आठवडे राज्यात थंडीचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळूहळू थंडी कमी होईल, असं पंडित वासरे यांनी सांगितलं.
या उलट ही थंडी रब्बी पिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. गहू, हरभरा, तूर यांसारखी पिके या थंडीच्या काळात चांगली येऊ शकतात. तसेच पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव देखील होत नाही. सर्वसामान्य नागरिकांनी देखील या थंडीचा आनंद घ्यावा. फक्त लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी. त्यांना उबदार कपडे परिधान करण्यास सांगावे. तसेच उघड्यावर झोपू नये.
सकाळी आणि सायंकाळी कामकाजावर काही प्रमाणात थंडीमुळे परिणाम होत असला तरी ही थंडी आरोग्याला आणि पिकांना देखील मानवणारी आहे. त्यामुळे यामध्ये असामान्य असं काही नसल्याचंही पंडित वासरे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.





